Type Here to Get Search Results !

‘हार्वर्ड’ अधिष्ठातापदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती महाराष्ट्र व देशाचा गौरव वाढवणारी : उपमुख्यमंत्री अजित पवार



‘हार्वर्ड’ अधिष्ठातापदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती महाराष्ट्र व देशाचा गौरव वाढवणारी : उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई : मूळचे भारतीय असलेले विश्वविख्यात शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची जागतिक किर्तीच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती महाराष्ट्र व देशाचा गौरव वाढवणारी आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


मुंबई विद्यापीठाचे पदवीधर व प्रयोगशील प्राध्यापक असलेल्या श्रीकांत दातार यांनी व्यवस्थापकीय शिक्षणाच्या क्षेत्रात विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बरोबरीने मानवी मूल्ये रुजवण्यावर भर दिला. औद्योगिक व्यवस्थापन जगतात वांशिक समानता आणण्याचा प्रयत्न केला. मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या त्यांच्या नेतृत्वामुळे हार्वर्ड बिझनेस स्कूलची प्रतिष्ठा अधिक वाढेल. त्यांची नियुक्ती महाराष्ट्रातील युवकांना प्रेरणा देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies