Type Here to Get Search Results !

मिटकीतील सातकी पाझर तलाव धोकादायक : जालिंदर कटरे ; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज



मिटकीतील सातकी पाझर तलाव धोकादायक : जालिंदर कटरे ; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यातील मिटकी येथील सातकी पाझर तलाव धोकादायक बनला असून याकडे प्रशासनाने लक्ष देवून सदरचा पाझर तलाव दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष जालिंदर कटरे यांनी केली आहे.


आटपाडी तालुक्यात दोन दिवस झाले पाऊस सक्रीय झाला आहे. मागील महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण तालुक्यातील छोटे-मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असून मोठ्या प्रमाणात गाव ओढ्यांना पाणी वाहत आहे. मिटकी गावालगत १९९५ साली पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली. या पाझर तलावामुळे मिटकी परिसरातील शेती मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. परंतु गेली दोन दिवस झाले तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने पाझर तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. तलावाची एक बाजू पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे खचली असून यामुळे तलावाला धोका निर्माण झाला असून मिटकी गावातील नागरीकामध्ये घबराट निर्माण झाली आहे.


त्यामुळे सातकी पाझर तलावाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देवून दुरुस्त करावा व तलावापासून गावाला होणारा धोका टाळावा अशी मागणी जालिंदर कटरे यांनी केली आहे.   


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies