तालुक्यात पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसानचे पंचनामे शासनाने लवकर करावेत-अनिल (शेठ) पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 24, 2020

तालुक्यात पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसानचे पंचनामे शासनाने लवकर करावेत-अनिल (शेठ) पाटीलतालुक्यात पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसानचे पंचनामे शासनाने लवकर करावेत-अनिल (शेठ) पाटील 

माणदेश एक्सप्रेस न्यूज  


आटपाडी प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने पंचनामे करावेत अशी मागणी सिद्धिविनायक उद्योग समूहाचे अध्यक्ष युवा नेते अनिल शेठ पाटील यांनी केली. 


विटयाचे प्रांताधिकारी संतोष भोर तहसीलदार सचिन लंगुटे यांची भेट घेऊन निवेदने दिले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, यल्लाप्पा पवार, संग्राम नवले, किरण पवार प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


युवा नेते अनिल पाटील यांनी गळवेवाडी आवळाई भागाचा दौरा केला. पावसामुळे पडलेल्या घराच्या भिंती डाळिंब पिकाचे नुकसान बाजरी पिकाचे नुकसान याची प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पावसामुळे बंधाऱ्यातील पाणी शेतात जाऊन झालेल्या पिकाची नुकसानीची माहिती घेतली.


शेंडेवस्ती येथील बंधाऱ्यातून पाणी वाहत असल्यामुळे शाळेकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे याठिकाणी फरशी पूल करावा अशी मागणी केली. सरसकट शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने आर्थिक सहकार्य करून शेतकऱ्यावर आलेले संकट दूर करावे अशी मागणी यावेळी केली. खासदार संजय (काका) पाटील, आमदार अनिल बाबर व प्रशासनाकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातील व ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन युवा नेते अनिल पाटील यांनी दिले.  


शेतकऱ्यावर ओढवलेले जादा पावसाचे संकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरले आटपाडी शनिवारचा शेळ्या-मेंढ्यांचा आठवडा बाजार सुरू करावा व शेतकऱ्यांची सोय करावी यासाठी प्रयत्न केले जातील.


No comments:

Post a Comment

Advertise