Type Here to Get Search Results !

म्हसवड-इंजबाव रस्त्यानजीकची विहिरी धोकादायक ; कठडे नसल्याने अपघात होण्याची शक्यता



म्हसवड-इंजबाव रस्त्यानजीकची विहिरी धोकादायक ; कठडे नसल्याने अपघात होण्याची शक्यता 

माणदेश एक्सप्रेस टीम


म्हसवड/अहमद मुल्ला : सातत्याच्या पावसामुळे म्हसवड-इंजबाव रस्त्यानजिकची विहिरी भरुन वाहू लागल्यामुळे या विहिरीनजिकचा वाहतुकीचा रस्ता खचुन तो धोकादायक झाला असुन अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हा धोकादायक रस्ता दुरुस्त करावा व संबंधित विहिरीस संरक्षण कठड्याचे बांधकाम करावे अशी मागणी महाराष्ट्र रंग कामगार संघटनेचे अध्यक्ष विस्वासराव साळुंखे यांनी केली आहे.


माण तालुक्यात विशेत: म्हसवड, खडकी, इंजबाव भागात गेली तीन महिन्यापासुन नियमित पाऊस पडत आहे. पावसामुळे या रस्त्यावरील खडकी गावाच्या हद्दीतील नागोबाचे शेत शिवारातील म्हसवड-इंजबाव या रस्त्या कडेस असलेली खोल विहिर भरुन वाहू लागल्यामुळे या विहिरीतच हा रस्ता खचून मोठा खड्डा पडलेला आहे व रस्त्याकडेच्या  खड्ड्यातही पाणी साचुन राहिल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक झालेला आहे. विशेष बाब म्हणजे या रसत्यावरुन खडकी, तुपेवाडी, इंजबाव, पश्चिम दिशेतील भालवडी, मार्डी तर पुर्व दिशेतील पर्यंती, हवालदारवाडी, कासारवाडी, कारखेल या भागातील नियमित मोठ्या संख्येने जड व हलक्या मालवाहतुकीच्या वाहनांची वर्दळ असते. खडकी गावाच्या हद्दीतील रस्त्याकडेची विहिर भरुन हा रस्ता खोल विहिरीत खचला आहे.


विहिरीलगत झाडे-झुडपे असल्यामुळे वाहन चालकांना विशेषतः रात्रीच्या वेळी संबंधित धोकादायक विहिर दिसुन येत नाही. परिणामी विहिरीलगतच्या धोकादायक रसत्यावरुन वाहन विहिरीत पडून संभाव्य मोठा अपघात टाळण्यासाठी तातडीने हा धोकादायक रस्ता दुरुस्त करुन विहिरीस कठडे बाधकाम करुन विहिर व रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी श्री.साळुंखे यांनी प्रशासनाकडे केली आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies