म्हसवड येथे लोकसहभातून उभारलेल्या कोविड हॉस्पिटलचे श्रीमंत रामराजे नाईक-निबाळकर यांचे हस्ते उदघाटन संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 22, 2020

म्हसवड येथे लोकसहभातून उभारलेल्या कोविड हॉस्पिटलचे श्रीमंत रामराजे नाईक-निबाळकर यांचे हस्ते उदघाटन संपन्नम्हसवड येथे लोकसहभातून उभारलेल्या कोविड हॉस्पिटलचे श्रीमंत रामराजे नाईक-निबाळकर यांचे हस्ते उदघाटन संपन्न 

माणदेश एक्सप्रेस टीम  


म्हसवड/अहमद मुल्ला ; लोकसहभागातून येथील शासकीय वस्तिगृहाच्या इमारतीत उभारलेल्या १५ ऑक्सिजन बेडचे कोरोना (कोविड १९) सेंटरचे उदघाटन विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कोविड केअर सेंटरमध्ये अत्यवस्थ रुग्णांना मोफत ऑक्सिजन सुविधा पुरवण्यात येणार आहेत.


यावेळी आमदार जयकुमार गोरे, नगराध्यक्ष तुषार वीरकर, पालिका उपाध्यक्ष सौ.स्नेहल सुर्यवंशी, म्हसवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष युवराज सुर्यवंशी, पृथ्वीराज राजेमाने, प्रांताधिकारी आश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण कोडलकर, डॉ.काकडे, म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने, नगरसेवक धनाजी माने, डॉ.प्रमोद गावडे, डॉ.चंद्रकांत साबळे, कैलास भोरे, डॉ.राजेंद्र मोडासे, नगरसेवक अकिल काझी, शिवसेना शहर प्रमुख राहुल मंगरुळे, अॅड. अभिजित केसकर, प्रशांत दोशी तसेच आजी-माजी नगरसेवक व देणगीदार अरंजय शहा, संजय शहा, नागरिक उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise