Type Here to Get Search Results !

अंधश्रध्देचा कळस ; चक्क कोरोना देवीची स्थापना



अंधश्रध्देचा कळस ; चक्क कोरोना देवीची स्थापना 


सोलापूर : डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी कोरोनामुक्तीसाठी लढत असताना दुसरीकडे अंधश्रद्धेचा कळस गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. बार्शीतल्या पारधी वस्तीत चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. या देवीला खुश करण्यासाठी बळी देण्याचा प्रकारही सुरु आहे.


सोलापुर कोरोनामुक्त होण्यासाठी प्रशासन झटत असतानाचं जिल्ह्यात अंधश्रद्धांना पेव फुटलं आहे. बार्शीत कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. कुठे टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून तर कुठे लहान गोलसर दगड ठेवून त्यालाच कोरोना देवी समजून पुजा केली जात आहे. 


तसेच या देवीला खुश करण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून पूजन केलं जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या देवीची पुजा केल्याने कोरोनाची बाधा होत नसल्याचा दावा करत अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचा आरोप होत आहे.


दरम्यान कोरोना या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर हाच सध्या तरी उपाय असल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies