वाळू तस्करांची शेतकऱ्याला मारहाण ; गळवेवाडी येथील घटना - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

वाळू तस्करांची शेतकऱ्याला मारहाण ; गळवेवाडी येथील घटनावाळू तस्करांची शेतकऱ्याला मारहाण ; गळवेवाडी येथील घटना 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : वाळू चोरी करणाऱ्यावर कडक कारवाई करावी म्हणून महसूल प्रशासनाला निवेदन दिल्याचा राग मनात धरून वाळू तस्करांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना गळवेवाडी येथे घडली असून याबाबत सदर शेतकऱ्यांने आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.  


याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंकुश ईश्वरा काळेल यांनी लक्ष्मण राजाराम राजाराम काळेल व नामदेव राजाराम काळेल हे दोघे गाव ओद्यातून बेकायदा वाळू तस्करी करीत असले बाबत आटपाडी तहसीलदार व प्रांताधिकारी विटा यांना तक्रारी अर्ज दिला होता. गेल्या ४ ते ५ दिवसापूर्वी गळवेवाडी तलाठी यांनी कारवाई करीत लक्ष्मण राजाराम काळेल याच्यावर कारवाई करीत त्याची बैलगाडी जप्त केली होती.


दिनांक ९ रोजी रात्री लक्ष्मण राजाराम काळेल, नामदेव राजाराम काळेल, चांगदेव नामदेव काळेल, भारत रामचंद्र काळेल, ज्ञानेश्वर लक्ष्मण काळेल हे घरी आले व प्रांताधिकारी कार्यालयात विटा तसेच आटपाडी तहसीलदार कार्यालय आटपाडी येथे दिलेला तक्रारी अर्ज तसेच गाव कामगार तलाठी यांनी जप्त केलेली बैलगाडी याचा राग मनात धरून वाळू तस्करांनी अंकुश रामचंद्र काळेल व त्यांचा मुलगा दिपक काळेल यांना मारहाण केली आहे.


याबाबत अंकुश काळेल यांनी आटपाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून सदर घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल तम्मा चोरमले करीत आहेत.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise