राजस्थान रॉयल्स चा सलग दुसरा विजय ; अशक्यप्राय धावांचा पाठलाग केला यशस्वी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 27, 2020

राजस्थान रॉयल्स चा सलग दुसरा विजय ; अशक्यप्राय धावांचा पाठलाग केला यशस्वीराजस्थान रॉयल्स चा सलग दुसरा विजय ; अशक्यप्राय धावांचा पाठलाग केला यशस्वी  


राजस्थान रॉयल्स ने पुन्हा एखदा धावांचा यशस्वी पाठलाग करीत KXIP ला पराभूत केले. राहुल तेवतीयाने अखेरच्या षटकामध्ये तुफानी फलंदाजी करीत तब्बल ३० धावा चोपल्याने राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. तर  12 चेंडू 21 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शमीनं 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर RR ला धक्का दिला. रॉबीन उथप्पा 9 धावांवर बाद झाला. पण, जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले आणि सामना पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं झुकवला. राहुल टेवाटियानं 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला. विजयासाठी अखेरच्या षटकात केवळ दोन धावा हव्या असताना शमीनं त्याला माघारी पाठवलं.


सॅमसन एका बाजूनं तुफान फटकेबाजी करत होता. चेन्नई सुपर किंग्सप्रमाणे KXIP लाही सॅमसनचा तडाखा बसत होता. पण, मोहम्मद शमीनं सामना फिरवला. 17व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं सॅमसनला माघारी पाठवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना RR ची सुरुवात निराशाजनक झाली. जोस बटलर लगेच माघारी परतला, पंरतु त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. या दोघांची 81 धावांची भागीदारी 9 व्या षटकात संपुष्टात आली. RR ला 100 धावांवर दुसरा धक्का बसला तो स्टीव्ह स्मिथचा. त्यानं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन उत्तुंग फटका मारला, तो जवळपास षटकारच होता, परंतु निकोलस पूरनने ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं, ते पाहून रितेश देशमुखही अवाक् झाला. त्यानं सोशल मीडियावर पूरनचे कौतुक केले.  


प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या KXIP ने मयांक अगरवाल चे शतक व कर्णधार केएल राहुल चे अर्धशतक  यांच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. मयांकनं 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलही पुढच्या षटकात माघारी परतला. त्यानं 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी भक्कम पाया रचल्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरन व ग्लेन मॅक्सवेल यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली आणि KXIPला 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा करून दिला. मॅक्सवेल 12, तर पूरन 25 धावांवर नाबाद राहिले.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise