निंबवडे पुलावरून वाहून जाणाऱ्या इसमाला तरुणांनी वाचवले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 19, 2020

निंबवडे पुलावरून वाहून जाणाऱ्या इसमाला तरुणांनी वाचवलेनिंबवडे पुलावरून वाहून जाणाऱ्या इसमाला तरुणांनी वाचवले 

माणदेश एक्सप्रेस टीम


निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे ता. आटपाडी, जि.सांगली येथून वाहणाऱ्या गाव ओद्याला प्रचंड प्रमाणात पाणी आले असून काल दिनांक १८ रोजी दुपारी ३ पासून आटपाडी-निंबवडे मार्गावर ओढ्याचे पाणी आल्याने वाहतुक बंद होती.निंबवडे सह आटपाडी परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच पूल पाण्याखाली गेले असल्याचं चित्र होते. दुपारी 3 वा पासून पावसाने जोर पकडल्याने चरायला गेलेले मेंढपाळ शेळ्या मेंढ्या सह शेतकरी वर्ग शेतात अडकून पडला. सायंकाळी बहुतेक पूल पाण्याखाली गेले निंबवडे येथे पुलावरून चाललेल्या पाण्यात एक व्यक्ती दुचाकीसह पडून वाहून जाताना तरुणांनी धाडसाने त्याला वाचवले.


यामध्ये अमर माने, समाधान पिंजारी, राम बुधावले, कुमार माने यांचा समावेश होता. सदर वाहून जाणाऱ्या इसमाचे प्राण वाचविल्याबद्दल तरुणांचे गावकऱ्यांनी कौतुक केले.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise