मनसे कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घ्या ; सर्वसामान्य नागरिकांतून मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 19, 2020

मनसे कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घ्या ; सर्वसामान्य नागरिकांतून मागणीमनसे कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घ्या ; सर्वसामान्य नागरिकांतून मागणी  


आटपाडी/प्रतिनिधी : राजपथ कंपनीच्या मोडतोड प्रकरणी गुन्हे दाखल झालेले मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष राजेश जाधव यांच्यासह अन्य ५ जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे राजपथ कंपनीने तात्काळ मागे घेण्याची मागणी शेटफळे येथील सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे.


मनसेच्या वतीने तहसिलदार कार्यालयाला शेटफळे-करगणी हा रस्ता राजपथ कंपनीच्या अवजड वाहनांमुळे खराब झाला आहे. तो रस्ता दुरुस्त करून द्यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. परंतु प्रशासनाकडून मनसेच्या निवेदनाची कोणतही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिनांक १७ रोजी दुपारी १२.०० चे सुमारास शेटफळे येथील राज्य महामार्गावरील व पात्रेवाडी येथील राजपथ इंफ्राकॉनच्या कंपनीच्या ऑफिसची मोडतोड तसेच पोकलँड व हायवा गाड्याच्या काचा फोडल्या होत्या.


याप्रकरणी कंपनीच्या वतीने आटपाडी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती व राजपथ कंपनीला रस्ता दुरुस्त केला असता तर एवढे सदरचे प्रकरण घडले नसते. त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागे घ्या व रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी होत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise