Type Here to Get Search Results !

सागरेश्वर अभयारण्य भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईसाठी वंचित आघाडीचे बुधवार पासून आमरण उपोषण



सागरेश्वर अभयारण्य भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईसाठी वंचित आघाडीचे बुधवार पासून आमरण उपोषण

माणदेश एक्सप्रेस न्युज


कडेगाव : यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य देवराष्ट्रे येथील विविध विकास कामातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर त्वरित फौजदारी स्वरूपाची कारवाई करणेच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभयारण्य गेटसमोर बुधवार पासून आमरण उपोषण करणार असलेचे निवेदन वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.


निवेदनात म्हटले आहे कि सागरेश्वर अभयारण्यात समितीच्या माध्यमातून साहित्य खरेदीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. बाजारभावापेक्षा दुप्पट ते चौपाट किंमतीत वस्तू खरेदी केली आहे. बोगस मजुरांची नावे नोंदवत आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. तसेच 3 वर्षांतील नमुना 32 रजिस्टर व धनादेश पुस्तकेच गायब केलेली आहेत, अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत, निकृष्ट कंपाउंडमुळे मोकाट कुत्र्यांचे हल्ले होऊन वारंवार हरिणांचे मृत्यू होत आहेत. त्याचप्रमाणे कॅशबुकमध्ये विविध केली नसलेली कामे दाखवत शासकीय निधीची लूटच केलेली आहे.  


याबाबत गेले वर्षभर माहिती अधिकार, निवेदन, आंदोलन याद्वारे कारवाई साठी मागणी करत असताना अद्याप कारवाई झालेली नाही, आंदोलनादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देऊन देखील कारवाई होत नसलेने आम्ही उपोषण करत आहोत.   


माहिती अधिकार व प्रत्यक्ष पाहणीत विविध प्रकारांतून करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे, देवराष्ट्र्यापासून महाराष्ट्रापर्यंत सर्व अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी करूनदेखील कारवाई झालेली नाही, याउलट याकडे टाळाटाळ व दुर्लक्ष करत उडवाउडवीची उत्तरे देत दिरंगाई केलेली आहे, बुधवारी होणाऱ्या आंदोलनात वंचितसह 15 विविध पक्ष व संघटना तसेच देवराष्ट्रे गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असून कोणत्याही परिस्थितीत कारवाई झालेशिवाय सदर आंदोलन स्थगित होणार नाही.   

राजेश गायगवाळे

जिल्हाध्यक्ष,

वंचित बहुजन आघाडी युवक


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies