सातारा जिल्हा बॅकेच्या म्हसवड शाखेत "शिक्षक दिन "साजरा" - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 14, 2020

सातारा जिल्हा बॅकेच्या म्हसवड शाखेत "शिक्षक दिन "साजरा"सातारा जिल्हा बॅकेच्या म्हसवड शाखेत "शिक्षक दिन "साजरा"

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या म्हसवड शाखेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. म्हसवड शाखा नेहमीचा  वेगवेगळे आदर्शवत  उपक्रम राबवत असल्यामुळे म्हसवड शाखा नेहमीच सर्व खातेदारांना आपलीच बॅक वाटतं असल्याचे चित्र पहावयाला मिळत आहे.  


भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनमुळे जिल्ह्यातील सर्व शाखा मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहेत. म्हसवड शाखेने नुकताच जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या  सौ. सुजाता कुभांर, सतिश कुंभार, अशोक जमाले, जावेद मुल्ला, आकाराम शिंदे, यशश्री शिंदे, सौ.सुजाता गवरे आदी शिक्षक बांधवांना निमंत्रित करून म्हसवड शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी म्हसवड शाखेच्या प्रमुख श्रीमती सविता कारंडे यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या नवीन योजनांची माहिती देत वैयक्तिक मध्यममुदत कर्ज रूपये २५ लाख, ओडी वरील कमी झालेले व्याजदर आदीसह बॅंकेच्या सर्व योजनांची माहिती देत त्याचा फायदा घेण्याचे आवाहनही श्रीमती करांडे यांनी केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विकास अधिकारी लहुराज पोळ यांनी केले तर आभार विकास अधिकारी महादेव गोरे यांनी आभार मानले.यावेळी कॅशियर विलास तोडकर, चंद्रकांत शेंडगे, विकास अधिकारी महादेव गोरे, लहुराज पोळ, ललिता वळवी, युवराज सरतापे, धनाजी जगदाळे, आनंदा झिमल आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


" विनम्र सेवेसाठी म्हसवड शाखेची परिसरात ओळख"

म्हसवड शाखेत सर्वच ग्राहकांना विनम्रपणेसेवा दिले जात असल्याचे चित्र नेहमी पहायला मिळत आहे. त्याचबरोबर जेष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या अडचणी तत्परतेने सोडविण्यासाठी बॅंकेचे सर्व कर्मचारी प्रयत्न करीत असतात.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise