दि.आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या सेवक पतमंडळाच्या मयत सभासद वारसांना पतमंडळाकडून १० लाखाची मदत ; पतमंडळाच्या निर्णयाचा मयत सभासदांच्या वारसांना फायदा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 15, 2020

दि.आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या सेवक पतमंडळाच्या मयत सभासद वारसांना पतमंडळाकडून १० लाखाची मदत ; पतमंडळाच्या निर्णयाचा मयत सभासदांच्या वारसांना फायदादि.आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या सेवक पतमंडळाच्या मयत सभासद वारसांना पतमंडळाकडून १० लाखाची मदत ; पतमंडळाच्या निर्णयाचा मयत सभासदांच्या वारसांना फायदा 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : दि.आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या सेवक मंडळाचे वार्षिक मिटींगमधे पतमंडळाचा सभासद  असणार्याी व्यक्तीचे आकस्मिक निधन झाल्यास पतमंडळातर्फे त्यांचे वारसांना १० लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय झाला होता.पतमंडळाचे सभासद असणारे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे वाणिज्य विभागप्रमुख पदावर कार्यरत असणारे शंकर परशराम पवार (मुळगांव शिवणी ता. कडेगांव) यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले. त्यांचे वारसांना पतमंळातर्फे  मदतीचा धनादेश देण्यात आला.  


याप्रसंगी दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख, पतमंडळाचे चेअरमन.डी.एन.कदम, व्हा.चेअरमन सुभाष माने, सचिव दशरथ बनसोडे व संचालक तसेच श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य विजय लोंढे त्यांचे सहकारी,शिवणी गावचे नेते मारूती(शेठ) पवार, विश्वनाथ पवार, गोरख पवार, जगन्नाथ पवार, व कै.पवार सर यांचे कुटुंबिय उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise