आटपाडी तालुक्यात आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३७ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक १५ रोजी तालुक्यात तब्बल ३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गळवेवाडी १ नवा रुग्ण, विभूतवाडी १ नवा रुग्ण, भिंगेवाडी २ नवे रुग्ण, तडवळे १ नवा रुग्ण, आवळाई १ नवा रुग्ण, नेलकरंजी ९ नवे रुग्ण, खरसुंडी १ नवा रुग्ण तर दिघंचीमध्ये पुन्हा कोरोनाचा फैलाव सुरु झाला असून आज तब्बल ११ नवे रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात आज ३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आजच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री ११ रुग्ण व पुरुष २६ रुग्ण असे एकूण असे ३७ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज