कुरुंदवाडी परीसरातील पिकांचे पावसाने मोठे नुकसान ; प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत ; सरपंच सौ. सविता वगरे यांची प्रशासनाकडे मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 7, 2020

कुरुंदवाडी परीसरातील पिकांचे पावसाने मोठे नुकसान ; प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत ; सरपंच सौ. सविता वगरे यांची प्रशासनाकडे मागणीकुरुंदवाडी परीसरातील पिकांचे पावसाने मोठे नुकसान 

प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत ; सरपंच सौ. सविता वगरे यांची प्रशासनाकडे मागणी 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : काल झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील कुरुंदवाडी येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबबात प्रशासनाने शेती पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी कुरुंदवाडीच्या सरपंच सौ. सविता तातोबा वगरे यांनी यांनी केली आहे.


रविवारी सायंकाळी व रात्री च्या सुमारास तालुक्यातील पश्चिम भागातील कुरुंदवाडी परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाऊसाबरोबरच वादळी वाऱ्याचा मोठा फटका पिकांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  


यामध्ये कुरुंदवाडी परीसरातील बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संपूर्ण बाजरी पिक आडवे झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे येथील पिकांची प्रशासनाने तातडीने पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी सरपंच सौ. सविता तातोबा वगरे यांनी केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise