शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 7, 2020

शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोनशरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. भारताबाहेरुन हा फोन कॉल आल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीबाबत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


तर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आला आहे. "कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही," असं गृहमंत्री अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावरुनच त्यांना कालच धमकीचा फोन आला होता.


दरम्यान गृहमंत्रालयाने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. परंतु याबाबत गृहमंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या प्रकरणी मंत्रिमंडळात चर्चा झाली असल्याचे समजते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise