IPL-2020 : राजस्थान ऱॉयल्सची विजयी सलामी ; चेन्नई सुपर किंग्सचा केला पराभव - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 22, 2020

IPL-2020 : राजस्थान ऱॉयल्सची विजयी सलामी ; चेन्नई सुपर किंग्सचा केला पराभवIPL-2020 : राजस्थान ऱॉयल्सची विजयी सलामी ; चेन्नई सुपर किंग्सचा केला पराभव


इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स  यांच्यातल्या सामन्यात संजू सॅमसन आणि स्टीव्ह स्मिथ  यांच्या वादळी खेळीने राजस्थान ऱॉयल्सची विजयी सलामी  दिली असून त्यांनी चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला आहे.


जोस बटलरच्या अनुपस्थितीत स्मिथ सलामीला आला. सॅमसनने जबरदस्त साथ दिली. पण, सॅमसन बाद झाल्यानंतर टप्प्याटप्य्यानं RRच्या विकेट्स पडल्या. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. याच धावा निर्णायक ठरल्या आणि RRने विजयी सलामी दिली.  धोनीची फटकेबाजी पाहण्यासाठी आतुर असलेल्यांची प्रतीक्षा संपली, धोनी मैदानावर आला. पण तो सावध खेळ खेळत होता. दुसऱ्या बाजूनं फॅफ चे वादळ घोंगावत होते. फॅफने अर्धशतक पूर्ण करताना CSKच्या विजयाच्या आशा जीवंत राखल्या होत्या. फॅफ आणि धोनीनं अर्धशतकी भागीदारी केली. 19 व्या षटकात फॅफ बाद झाला आणि CSKचा पराभवही निश्चित झाला. त्याने 37 चेंडूंत 72 धावा चोपल्या. त्यात 1 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. धोनीने अखेरच्या षटकात ३ उत्तुंग षटकार मारले, परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. CSKने 6 बाद 200 धावा केल्या. RRने 16 धावांनी हा सामना जिंकला.  


राजस्थान ऱॉयल्स कडून संजू सॅमसन ने सर्वाधिक ३२ चेंडूत ७४ धावा केल्या. यामध्ये त्याने तब्बल ९ षटकार व १ चौकार मारत चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची हवाच काढून घेतली.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise