शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 23, 2020

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण


माणदेश एक्सप्रेस न्युज 

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 


प्रा. वर्षा गायकवाड यांचे एक स्वीय सहाय्यक नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून मंत्रालयातील त्यांच्या दालनात अधिकारी वर्गामध्ये एक भीतीचे वातावरण पसरले होते. अशा परिस्थितीमध्ये सायंकाळी वर्षा गायकवाड यांनी आपल्यालाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिल्याने त्यांचे दालन तात्पुरते बंद ठेवण्यात आले.  


मंत्रालयात समोर असलेल्या गायकवाड यांच्या बंगल्यामध्ये मागील काही दिवसांत राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी वर्गाची मोठी वर्दळ सुरू होती. बदल्यांसाठी येथे अनेकांची वर्दळ सुरू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून येथील कर्मचाऱ्यांच्या केलेल्या तपासणीत काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या तपासणीत वर्षा गायकवाड यांना स्वतःलाही कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.  


मागील आठवड्यात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे क्वारंटाईन संपण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसात शालेय शिक्षण विभागाच्या अनेक महत्त्वाच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise