दुष्काळी तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेतून कृष्णा नदीच्या पुरातील 1 .75 टी.एम.सी. पाणी उचलले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 16, 2020

दुष्काळी तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेतून कृष्णा नदीच्या पुरातील 1 .75 टी.एम.सी. पाणी उचलले



दुष्काळी  तालुक्यासाठी  म्हैसाळ  योजनेतून कृष्णा नदीच्या पुरातील 1 .75 टी.एम.सी. पाणी  उचलले< /b>


सांगली : कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी म्हैसाळ  उपसा  सिंचन योजनेतून उचलून योजनेच्या लाभक्षेत्रातील कायम स्वरुपी दुष्काळी  6 तालुक्यातील सर्व तलाव व बंधारे भरण्याबाबतचे आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार दि. 17 ऑगस्ट 2020 पासून गेला महिनाभर पावणेदोन टी .एम.सी. पाणी योजना चालवून उचलण्यात आले व कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी  भागासाठी देण्यात आले. यासाठी योजनेच्या विविध टप्यातील साधारणत: 70 ते 75 पंप चालविाण्यात आले. अशी माहिती ताकारी म्हैशाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी दिली.


उचललेल्या पाण्यातून मिरज तालूक्यातील 2 ल.पा. तलावासह इतर 66 पाणी साठे, कवठेमहांकाळ तालूक्यातील 5 ल.पा. तलावासह इतर 41 पाणी साठे, तासगांव तालुक्यातील 3 ल.पा. तलावासह इतर 5 पाणी साठे, यासाठी 850 द.ल.घ.फू.पाण्याचा वापर करण्यात आला व एकूण 68 गावांना त्याचा फायदा झाला. तसेच जत तालुक्याजील 5 ल.पा. तलावासह इतर 37 पाणी साठे, सांगोला तालुक्यातील 17 पाणी साठे व मंगळवेढा तालुक्यातील 2 पाणी साठे भरुन देण्यात आले. यासाठी 900 द.ल.घ.फू. पाण्याचा वापर करण्यात येऊन 37 गावांना त्याचा फायदा   झाला. अशा प्रकारे योजनेतून 1.75 टी.एम.सी .पाणी उचलून सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव व जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या 6 तालुक्यातील  योजनेच्या लाभाक्षेत्रातील पाणी साठे भरुन देण्यात आलेले आहेत व त्याचा अंदाजे 30 हजार हेक्टर क्षेत्रासाठी फायदा होणार आहे. कृष्णा नदीतील पुराचे अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळी  भागात दिल्यामुळे या भागास पिण्यासाठी व शेतीसाठी पुढील काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे.


तालुकानिहाय गावांची संख्या, तलावांची संख्या व कंसात सोडण्यात आलेले पाणी (तलाव + नाला बंधारे) पुढीलप्रमाणे. सांगली जिल्ह्यातील मिरज - 34 गावे, 68 तलाव, 265.25 द.ल.घ.फू., तासगाव - 8 गावे, 8 तलाव, 217.32 द.ल.घ.फू.,  कवठेमहांकाळ - 26 गावे, 41 तलाव, 366.78 द.ल.घ.फू., जत - 23 गावे, 42 तलाव, 518 द.ल.घ.फू., सोलापूर जिल्ह्यातील सांगोला - 7 गावे, 17 तलाव, 231.70 द.ल.घ.फू., मंगळवेढा - 7 गावे, 2 तलाव, 151 द.ल.घ.फू.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

No comments:

Post a Comment

Advertise