वैद्यकीय अधीक्षक डॉ. तांबोळी यांनी स्वतः हाकली रुग्णवाहिका ; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 16, 2020

वैद्यकीय अधीक्षक डॉ. तांबोळी यांनी स्वतः हाकली रुग्णवाहिका ; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल



वैद्यकीय अधीक्षक डॉ. तांबोळी यांनी स्वतः हाकली रुग्णवाहिका ; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तांबोळी यांनी कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असणारा ऑक्सिजनचा साठा आणण्यासाठी, चालक रजेवर असल्यामुळे स्वतः रुग्णवाहिका चालवली व रुग्णांना ऑक्सिजन पोहोच केला. त्यांचा तो व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून 


चर्चेत आला आहे.


कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करत असताना वैद्यकीय अधीक्षक पदावर  कार्यरत डॉ. तांबोळी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. आता डॉ. तांबोळी पूर्ण कोरोनामुक्त झालेले असले तरी अन्य सहकारी डॉक्टर व स्टाफ कोरोनाबाधित झालेले आहेत. स्वतः औषधोपचार घेत असलेतरी विलागीकरन केलेल्या अवस्थेत दूरध्वनीवरून लोकांना जागरूक राहण्यासाठी सतर्कता व काळजी घेण्यास मार्गदर्शन करीत आहेत.  


स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या कोविड योद्ध्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. नागरिकांनी स्वतःवर संयम ठेवून विषाणू संसर्ग होवू नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे, तसेच वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय व्यावसायिक यांच्याशी गैरवर्तन न करता, समजूतदारपणे वागणे गरजेचे आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise