धोनीला कर्णधार म्हणून नेमताना यशाची खात्री होती : शरद पवार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 15, 2020

धोनीला कर्णधार म्हणून नेमताना यशाची खात्री होती : शरद पवार

 धोनीला कर्णधार म्हणून नेमताना यशाची खात्री होती : शरद पवार 

माणदेश एक्सप्रेस न्युज


मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याला बीसीसीआय चे व आयसीसीचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष खास. शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


याबाबत शरद पवार यांनी ट्वीट केले असून त्यामध्ये ते म्हणतात, क्रिकेटच्या खेळाशी माझा दीर्घकाळ संबंध आहे आणि एम एस धोनीला कर्णधार म्हणून नेमताना मला खात्री होती की तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होईल. 


क्रिकेटमधील त्यांचे योगदान अद्वितीय आणि प्रेरणादायक आहे आणि त्याचे विक्रम अनुकरणीय आहेत. माझ्या शुभेच्छा नेहमी त्याच्या बरोबर असतात.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेसNo comments:

Post a Comment

Advertise