सांगली जिल्ह्यातील “या” पोलिस ठाण्यातील सात पोलिसांना कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, August 14, 2020

सांगली जिल्ह्यातील “या” पोलिस ठाण्यातील सात पोलिसांना कोरोनाची लागण

 

सांगली जिल्ह्यातील  “या” पोलिस ठाण्यातील सात पोलिसांना कोरोनाची लागण


सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या कासेगाव पोलिस ठाण्यातील सात पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 


सोमनाथ वाघ यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर इस्लामपूर येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिस ठाण्यातील त्यांच्या संपर्कातील पोलिस कर्मचाऱ्यांचे स्वब तपासणीसाठी घेण्यात आले होते. 


त्याचा  अहवाल आज (दि. 14 ) रोजी आला असून यामध्ये सात पोलिस कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर येथील कोव्हीड केअरसेंटरमध्ये  उपचार करण्यात सुरु आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise