Type Here to Get Search Results !

पीपीई किटची शुल्क आकारणी रुग्णालयांनी नियमानुसार करावी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


पीपीई किटची शुल्क आकारणी रुग्णालयांनी नियमानुसार करावी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या रूग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी पीपीई किटचा गरजेनुसार आवश्यक वापर करणे बंधनकारक आहे. 


पीपीई किटची (एन 95 मास्कसह) किंमत हॉस्पीटल बिलांमध्ये समाविष्ट करताना निव्वळ खरेदी किंमतीपेक्षा कमाल 10 टक्के अतिरिक्त मर्यादेत रक्कम आकारावी व एकूण वापरण्यात आलेल्या पीपीई किटची मान्यता जिल्हा शल्य चिकित्सक सांगली यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी, असे निर्देश (Collector Dr. Abhijeet Chaudhary) जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.


सद्यपरिस्थितीत जिल्ह्यातील (Mahatma Jotiba Phule Jan Arogya Yojana) महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीगृत असलेली व नसलेली खासगी रुग्णालये कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये रूग्णांवर उपचारावेळी वापरण्यात आलेली पीपीई किट  (एन 95 मास्कसह) एकापेक्षा जास्त रुग्णांसाठी वापरले जात असल्याने त्याची एकत्रित संख्या रुग्णालयातील एकूण दाखल रुग्णांमध्ये विभागून जिल्हा शल्य चिकित्सक सांगली यांच्यामार्फत प्रमाणित करुन दिली जाईल. 


तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत ई-निविदा प्रक्रियेने खरेदी केलेल्या DRDE / SITRA प्रमाणित पीपीई किट (एन95 मास्कसह) ची किंमत प्रति किट 367 रूपये आहे. हीच किंमत खाजगी कोविड रूग्णालयांमध्ये (Non MJPJAY) वापरलेल्या पीपीई किट (एन९५ मास्कसह) साठी निव्वळ खरेदी किंमत म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. याबाबत खाजगी हॉस्पीटलना आदेशित करण्यात आल्याचे (Collector Dr. Abhijeet Chaudhary) जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies