एसटी महामंडळ सुरु करणार पेट्रोल पंप ; मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली माहिती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 18, 2020

एसटी महामंडळ सुरु करणार पेट्रोल पंप ; मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली माहिती


एसटी महामंडळ सुरु करणार पेट्रोल पंप ; मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली माहिती 


मुंबई : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने नवा स्त्रोत म्हणून सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करणार आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी यासंदर्भात माहिती दिली.


यासंदर्भातील सामंजस्य करार झाल्यानंतर ते बोलत होते. एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात हा करार करण्यात आला. या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर ३० ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि ५ ठिकाणी एल.एन.जी.पंप (liquifid Natural Gas) सुरु करण्यात येणार आहे. हे पेट्रोल-डिझेलपंप/ एल.एन.जी.पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या हजारो कोटीच्या उत्पन्नाला एसटीला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक हा भाग आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise