Type Here to Get Search Results !

महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेल्यांनी आधारकार्ड, ईमेल, मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक, अन्यथा सेवायोजन कार्ड 31 ऑगस्ट अखेर रद्द


महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेल्यांनी आधारकार्ड, ईमेल, मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक, अन्यथा सेवायोजन कार्ड 31 ऑगस्ट अखेर रद्द


सांगली, दि. 18 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली या कार्यालयाच्या विभागाच्या महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेल्या व आधार कार्ड नंबर व ईमेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी नोंदणीमध्ये आधारकार्ड नंबर व ईमेल, मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. अन्यथा सेवायोजन कार्ड 31 ऑगस्ट 2020 अखेर रद्द होईल. तरी सेवायोजन कार्ड अपडेट करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.


ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील (Home page) रोजगार (Employment) हा पर्याय निवडून नोकरी साधक (Job Seeker) हा पर्याय निवडून आपला युजर आयडी व पासवर्ड वापरून Login व्हावे व आधारनंबर या ठिकाणी आपला आधार नंबर नमुद करून कॅप्च्या (captcha) टाकून सबमिट (Submit) या बटनावर क्लिक करावे. जेणेकरून आपली माहिती अद्ययावत होईल. अन्यथा सेवायोजन कार्ड 31 ऑगस्ट 2020 अखेर रद्द होईल. सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना काही अडचण आल्यास 0233-2600554 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.


नविन नाव नोंदणीसाठी पाथ  - www.mahaswayam.gov.in - Home page - Employment - Job Seeker - Login. आधार लिंक करण्याच पाथ  - www.mahaswayam.gov.in - Home page - Employment - Job Seeker - User ID - PassWord - Login - Adhar Number - Captcha.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies