यावर्षीचा खेळ रत्न पुरस्कार मिळणार ”या” चौघांना - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 18, 2020

यावर्षीचा खेळ रत्न पुरस्कार मिळणार ”या” चौघांना

 

यावर्षीचा खेळ रत्न पुरस्कार मिळणार ”या” चौघांना 


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्मासह आशियाई सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरिअप्पन थंगवेलू यांचा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मान होणार आहे. 


यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांच्यासह 12 सदस्यीय पुरस्कार निवड समितीने या चौघांच्या नावाची शिफारस केली आहे. 


या शिफारसीनंतर केंद्रीय क्रीडा मंत्रायलाची मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यानंतर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद निवडण्यात आलेल्या खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise