Type Here to Get Search Results !

तासगाव येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन ‘सीएचबी’ भरती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शन


तासगाव येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन ‘सीएचबी’ भरती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शन


सांगली दि.२१ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव जिल्हा सांगली येथे दि. २० ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या भरतीला शासनाने स्थगिती द्यावी. ही भरती नसून वशिलेबाजी आहे. भरतीची जाहिरात केवळ नावापुरती असून नेहमी अनेक वर्ष त्याच त्याच उमेदवारांचे सिलेक्शन होत आहे.

 


अनुसूचित जातीच्या उमेदवाराला नेहमी डावलेले जाते. संबंधित प्राचार्य, विभाग प्रमुख आपल्या मर्जीतील उमेदवार निवडतात,  ही प्रकिया पारदर्शक नसते. शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव जिल्हा सांगली येथील प्राचार्यांचा हुकुमशाही कारभार आहे.  


सांगली जिल्ह्य़ात पुरग्रस्त परिस्थिति आहे. कोरोना रूग्ण दिवसांदिवस वाढत आहेत, वाहतूक सुरळीत नाही, विविध गावांची बंदी आहे, यामुळे पात्र उमेदवारांना या भरतीचा फायदा मिळणार नाही व ते या प्रकियेपासून मुकतील.  


आधीच चार पाच महिन्यांचे सीएचबी पगार थकीत असताना ही भरती महाविद्यालयाने कोणाच्या फायद्याची करायची ठरवली आहे. या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे का? ही घाईगडबड कोणासाठी?   ही भरती दिवाळखोरीची उदाहरण आहे. याच्या मागचे गौडबंगाल काय आहे?   कायमस्वरूपी भरती असणारे प्राध्यापक या विद्यार्थ्यांचा सदरचा लोड सहज सांभाळू शकतात. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली संबंधित प्राध्यापक हे तसेच बसून आहेत.  


मात्र सुपर क्लास वन ऑफिसर म्हणून शासनाचा पगार बसून घेत आहेत. अनेक वर्षापासून त्याच त्याच उमेदवारांची निवडी केल्या जात आहेत. शासनाने या उमेदवारांचे नियमित करण्याबाबतचे धोरण दिसून येत नाही.


सीएचबी भरती हे आरक्षण व संविधान विरोधी आहे, यात शोषण व मनमानी कारभार होत असते, सीएचबी हे पद्धत शासनाने कायमस्वरूपी बंद करावी व एमपीएससीतून कायमस्वरूपी भरती करावी.  शासनाने व उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या कॉलेज प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शने करण्यात आले.  


यावेळी रिपब्लिकन स्टुडंट फोरम प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा अध्यक्ष मानतेश कांबळे, गौतम भगत ,आकाश कांबळे, अमीर शेख, अँड.नितीन संबोधि, रोहन मुळीक, कीरण कांबळे आदींनी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies