Type Here to Get Search Results !

गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्त दान करा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्त दान करा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे रक्त संकलनावर व रक्ताच्या मागणीवर परिणाम झालेला आहे.  


सद्या लॉकडाउन शिथिल झाल्यानतंर कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असले तरी  जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या हृदयरोग, कॅन्सर या सारख्या शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर थॅलेसिमिया, हिमोफिलीया, अनिमिया रूग्णांना बरोबर गुतांगुतीची शस्त्रक्रिया, गरोदर माता प्रसुती शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रूग्ण यांना रक्ताची गरज भासत आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यामुळे उद्भवत असलेल्या डेंगू, चिकणगुणीया या साथीच्या अजारामुळे रक्त व रक्तघटकांची मागणी वाढलेली आहे. जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी (Collector Dr. Abhijeet Chaudhary) यांनी केले आहे. 


सध्या वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भावामुळे आणि महाविद्यालयांना असलेल्या सुट्ट्यांमुळे रक्तपेढ्यापुढे रक्त संकलनाचे मोठे आवाहन उभे राहिले आहे. त्यातच कोरोनाच्या संसर्ग भीतीची अधिक भर पडली आहे. त्यामुळे रक्त संकलनावर परिणाम होत असून रक्तदान शिबीरे रद्द किंवा स्थगित केली जात आहेत.


सद्या जिल्ह्यातील 2 शासकीय व 16 खाजगी अशा एकूण 18 रक्तपेढ्या असून रक्तपेढ्याकडे 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशी माहिती रक्तपेढी नोडल अधिकारी विवेक सावंत यांनी दिली आहे.  


जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. कोरोनाच्या परस्थितीत रक्तदान करू नये असे काहीही नसून रक्तदान केल्याने कुठलाही धोका नाही.  


कोरोना बाधितांवरील उपचारासाठी नाही तर बाळांतपण, विविध शस्त्रक्रिया, कर्करोग, थॅलेसिमिया, अशा अजारावरील उपचारासाठी रक्ताची मोठी निकड असते. त्यामुळे सर्वानी मोठ्या प्रमाणात रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा व आपल्या जवळच्या रक्तपेढीत, रुग्णालयात किंवा सोसायटीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदान करावे.  

रक्तदात्यांची संपूर्ण सुरक्षितता राखून स्वंयसेवी संस्था, युवक मंडळे, राजकीय संस्था यांनी रक्तदान शिबीरे घ्यावीत असे आवाहनही  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी (Collector Dr. Abhijeet Chaudhary) यांनी केले आहे. शासकीय रक्तपेढीकडे रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 0233-2374651-54, 0233-2232090-95, व 9860426493, 9049500097, 9011651402 या क्रमांकावर संपर्क साधावा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies