Type Here to Get Search Results !

पंचायत समिती कवठेमहांकाळ येथील कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री जयंत पाटील यांची सोहळ्यास उपस्थिती

 पंचायत समिती कवठेमहांकाळ येथील कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण

___________________________________________________________________________

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री जयंत पाटील यांची सोहळ्यास उपस्थिती



सांगली : स्व.आमदार आर.आर. (आबा) पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम सन 2014-15 मधून मंजूर झालेले पंचायत समिती कवठेमहांकाळ येथील कर्मचारी निवासस्थान टाईप 2 चे आठ व अधिकारी निवासस्थान टाईप 4 चे दोन या निवासस्थानांचे लोकार्पण स्व.आर आर आबा यांच्या जयंती निमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व जलसंपदा व लाभ क्षेत्र मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, आमदार सुमनताई पाटील, तालुका पंचायत समितीचे सभापती विकास हक्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती श्रीमती पाटील, रोहित आर आर पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.


पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशा स्थितीत नागरिकांनी दुखणे अंगावर काढू नये त्याकडे दुर्लक्ष करू नये त्वरीत उपचार करावेत उपचार वेळेत झाल्यावर धोका टाळता येतो. अँटीजेन टेस्ट सर्वत्र चालू केली आहेत. सांगलीत लवकरच 400 बेडचे कोरोनासाठी नवे हॉस्पिटल उभे केले जात आहे. या संपूर्ण काळात लोकांनी सहाकार्य करावे अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. नदीचे पाणी वाहून कर्नाटकात जात असते त्या कालावधीत टंचाईग्रस्त भागातील तलाव भरण कार्यक्रम आजपासून सुरू होणार आहे. टेंभूचे पाणी सांगोल्यापर्यत व म्हैसाळचे पाणी जत पर्यत नेवून सर्व तलाव भरूण घेण्यात येणार आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील पाणी प्रश्नही सुटेल.


कवठेमहांकाळ तालुक्यातील प्राथमिक शाळाच्या खोल्या व अंगणवाड्या इमारतीच्या खोल्या ग्रामपंचायत कार्यालय स्मशानशेड सुसज्ज करण्यात येतील असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. यावेळी त्यांनी ग्रामविकास विभागाचा अधिकाधिक निधी ग्रामीण भागात दिला जाईल. 15व्या वित्त आयोगाचा निधी अखर्चीत आहे तो ग्रामपंचयातीनी आराखड्यानुसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खर्च करावा.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies