आटपाडी शहरात आज ५ महिन्याच्या बाळासह एकाच घरातील ५ जणांना कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 16, 2020

आटपाडी शहरात आज ५ महिन्याच्या बाळासह एकाच घरातील ५ जणांना कोरोनाची लागण

आटपाडी शहरात आज ५ महिन्याच्या बाळासह एकाच घरातील ५ जणांना कोरोनाची लागण 

माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये आज कोरोनाचे ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर तालुक्यातील दिघंची येथे १ व तळेवाडी येथे १ असे तालुक्यात एकूण ८ रुग्ण आढळून आले आहेत.


यामध्ये आटपाडी वाणी गल्ली परिसरातील ५ महिन्याच्या बाळासह एकाच कुटुंबातील ५ जणांना लागण झाली आहे. यामध्ये पती, पत्नी, मुलगा व आई वडील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुलाणकी येथील प्रसिद्ध गॅरेज मालकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


दिघंची येथील एक जण व तळेवाडी येथील एकजण यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात आज अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६४ झाली आहे. 


कोरोनोचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी भिती न बाळगता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा व गरज असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे आवाहन सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी नागरिकांना केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise