Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २४ नवे रुग्ण


आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २४ नवे रुग्ण 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचा धडाका सुरूच असून आज कोरोनाचे २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


यामध्ये आटपाडी शहर ६, यपावाडी ६, करगणी १०, गोमेवाडी १, झरे १ असे २४ नवे रुग्ण आहेत. आटपाडी शहारामध्ये आज एकूण ६ नवे रुग्ण आढळून आलेले असून हे सवर्जण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत. यपावाडी येथील ६ रुग्णांचा अहवाल ही पॉझिटिव्ह आला आहे. 


तालूक्यातील गोमेवाडी व झरे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर करगणी येथील एकूण १० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने करगणी परीसरामध्ये खळबळ उडाली आहे.


आज तालुक्यात एकूण २४ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. सातत्याने वाढत असणाऱ्या रूग्णामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, मास्कचा वापर करावा व महत्त्वाचे सोशल डिस्टस्निंगचे पालन करावे असे आवाहन ही डॉ. साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies