Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा


सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा


सांगली, दि. 18  : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.


आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 91.95 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 11.96 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.17 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.30 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.33 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 23.54 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.29 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 100.64 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 


सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 55486 क्युसेक्स, धोम 210, कण्हेर धरणातून 6956 क्युसेक्स, वारणा धरणातून 12042 क्युसेक्स, दूधगंगा धरणातून 7700 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 4256 क्युसेक्स, तुळशी धरणातून 504 क्युसेक्स, कासारी धरणातून 1300 क्युसेक्स, पाटगाव 2393 क्युसेक्स, धोम बलकवडी धरणातून 1233 क्युसेक्स, उरमोडी धरणातून 1710 क्युसेक्स, तारळी धरणातून 2626 क्युसेक्स, अलमट्टी धरणातून 2 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी  व  कंसात इशारा पातळी  फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा  पूल  कराड 27.6 (45), आयर्विन  पूल सांगली 39 (40) व अंकली पूल हरिपूर 42.6 (45.11).


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies