पुण्यातील उपमहापौर आणि सहा नगरसेवक यांना कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

पुण्यातील उपमहापौर आणि सहा नगरसेवक यांना कोरोनाची लागण


पुण्यातील उपमहापौर आणि सहा नगरसेवक यांना कोरोनाची लागण
पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ उपमहापौर सरस्वती शेडगे यांच्यासह पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर पुण्यातील दोन खासदार व चार आमदार होम क्वारंटाईन झाल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या तब्बल 200 कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिका कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतोच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता उपमहापौर यांच्यासह सहा नगरसेवक यांना कोरोना झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम कमी केले आहेत. त्याचबरोबर काहींनी तर घराबाहेर पडणेच बंद केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise