अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर दौऱ्यावर पडदा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर दौऱ्यावर पडदा


अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर दौऱ्यावर पडदा
नाशिक : नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: अभिनेता अक्षय कुमारच्या नाशिक दौऱ्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला असून यावर स्पष्टीकरण देताना भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास मी सांगितले होते. चौकशीत मुंबई पोलिसांनी अक्षय कुमारला परवानगी दिली होती. त्यामुळेच त्याचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आल्याचे म्हणाले आहेत.
दरम्यान अभिनेता अक्षय कुमारचा नाशिकचा खासगी दौरा वादात अडकला होता. हेलिकॉप्टरची परवानगी अक्षय कुमारला कशी मिळाली? तसेच, त्याला ग्रामीण भागात शहरी पोलिसांचे संरक्षण का? याप्रकरणी छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तसेच गाडीतून मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री फिरत असताना, अभितेना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली?, असा सवाल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

No comments:

Post a Comment

Advertise