अर्शद वारसीला एक लाखाचे लाईटबिल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 5, 2020

अर्शद वारसीला एक लाखाचे लाईटबिल


अर्शद वारसीला एक लाखाचे लाईटबिल
मुंबई : अभिनेता अर्शद वारसीला विजबिलाचा मोठा शॉक बसला. एक लाखाहून अधिक बिल आल्याने अर्शद चांगलाच संतापला होता. त्याने टवीट करत सरळ अदानींवर निशाणा साधला होता. मात्र त्याने टवीट केल्यानंतर तात्काळ अदानी इलेक्ट्रिसिटीकडून दखल घेतल्याने त्याने आपले टिवट डिलिट केले.
राज्यात अनेक नागरिकांना जवळपास दुप्पट ते तिप्पट बिल आल्याने लोक परेशान आहेत. यासंदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली आहेत. अभिनेता अर्शद वारसीला देखील भरमसाठ विजबिल आलं आहे. एक लाख तीन हजार रुपयांचे विजबिल पाहून तो संतापला होता. त्याने टवीट करत ’हायवे लुटारु ’अदानी’कडून आलेले हे माझे वीज बिल. आमचे बिल बघून चांगलेच हसू येत आहे. 1,03,564.00 रुपये तुमच्या खात्यातून 5 जुलै 2020 रोजी डेबिट झाले’ असे टवीट अर्शदने केले होते. विशेष म्हणजे या टवीटसोबत अर्शदने अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा हसतानाचा फोटो अर्शदने शेअर केला होता.

दुसर्या एका टिवटमध्ये त्याने म्हटलं होतं की, पेंटिंग विकून अदानीचं विज बिल भरायचं आहे. कृपया लोकांनी माझी पेंटिंग विकत घ्यावी. म्हणजे मला पुढील बिल भरायला रक्कम उपयोगात येईल असं त्यानं म्हटलं होतं.
त्याने केलेल्या या टिवटची दखल तात्काळ घेतली गेली. त्यामुळं नंतर त्याने हे दोन्ही टिवट डिलिट केली. अदानी इलेक्ट्रिसिटीकडून समस्या सोडवण्यात आली असल्याचं त्यानं म्हटलं आहे. ’अंधार असलेल्या बोगद्याच्या शेवटी एक प्रकाश आहे. अदानी अदानी इलेक्ट्रिसिटी तात्काळ प्रतिसाद मिळाला, समस्या सुटली. आपल्याला फक्त त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे .... धन्यवाद’

No comments:

Post a Comment

Advertise