विठ्ठल मंदिरातील दान पेटीत १६ लाखांची देणगी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 5, 2020

विठ्ठल मंदिरातील दान पेटीत १६ लाखांची देणगी


विठ्ठल मंदिरातील दान पेटीत १६ लाखांची देणगी 
पंढरपूर : पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर लॉकडाऊनमुळे दर्शनासाठी बंद असतानाही आषाढी वारी काळात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या दान पेटीत चक्क 16 लाख 15 हजार 860 रुपयांची देणगी जमा झाली आहे.
देशात कोरोना विषाणूचा कहर सुरू असल्याने जनजीवन ठप्प झाले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोरोनामुळे मंदिराची दारे बंद आहेत. मंदिर बंद ठेवण्याचे आदेशच प्रशासनाने काढले होते. त्यानुसार 17 मार्चपासून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीणीचे मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले.
देशात लॉकडाऊन सुरू झाला. त्याच काळात पंढरपूरची चैत्री एकादशी आली या काळातही मंदिर बंद ठेवण्यात आले. त्या पाठोपाठ आषाढी एकादशीची यात्राही बंद राहिली. पहिल्यांदाचा चंद्रभागेचा तिरावर वारकरी दिसला नाही. दरवर्षी पंढरपूरच्या आषाढीवारीला अंदाजे 8 ते 10 लाख भाविक हजेरी लावतात.  लॉकडाऊन असले तरीही 22 जून ते 2 जुलै अशा 10 दिवसात श्री विठ्ठलाच्या चरणांवर जवळपास 16 लाख 16 हजारांची देणगी जमा झाली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise