आटपाडीतील डाळिंब मार्केट दिनांक ३१ पर्यंत बंद - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 26, 2020

आटपाडीतील डाळिंब मार्केट दिनांक ३१ पर्यंत बंद


आटपाडीतील डाळिंब मार्केट दिनांक ३१ पर्यंत बंद 
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख डाळिंब मार्केट यार्ड दिनांक २७ जुलै ते ३१ जुलै २०२० पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी दिली. आटपाडी शहरासह तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यातच कोव्हीड योद्धे डॉक्टर व पोलीस व आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सांगली जिल्ह्यात ही दिनांक ३० पर्यंत लॉकडाऊन आहे तर आटपाडी शहरामध्ये ग्राम आपत्ती समितीने जनता कर्फ्यू लागू असून तालुक्यातील अनेक गावामध्ये जनता कर्फ्यूचे पालन करण्यात येत आहे. 


त्यामुळे आटपाडीचे डाळिंब मार्केट हे दिनांक २७ पासून दिनांक ३१ पर्यंत बंद राहणार असल्याने शेतकरी, व्यापारी यांनी याची नोंद घ्यावी. तर दिनांक २ ऑगस्ट २०२० पासून मार्केट पुन्हा सुरु होणार असल्याचे बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Advertise