एकाच दिवशी ३२ जण कोरोना पॉझिटीव्ह ; कैदी, पोलीस अधिकारी यांचा समावेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 18, 2020

एकाच दिवशी ३२ जण कोरोना पॉझिटीव्ह ; कैदी, पोलीस अधिकारी यांचा समावेश


एकाच दिवशी ३२ जण कोरोना पॉझिटीव्ह ; कैदी, पोलीस अधिकारी यांचा समावेश
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/प्रतिनिधी : मंगळवेढ्यात कोरोनाचा हाहाकार उडाला असून एकाच दिवशी ३२ जण पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. सदर पॉझिटीव्ह रूग्णामध्ये कैदी, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे.
मंगळवेढ्याच्या ग्रामीण रुग्णालयाकडून ११९ व्यक्तींच्या रॅपीड अॅून्टीजन टेस्ट घेण्यात आली होती. यामध्ये सबजेल मधील २८ कैदी, १ पोलीस अधिकारी, २ सुरक्षा रक्षक, १ सबजेल आहार पुरवठादार असे एकुण ३२ जणांचे रॅपीड अॅीन्टीजन टेस्ट पॉझीटीव्ह आली असून या घटनेमुळे मंगळवेढयात एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवेढा सबजेलमध्ये ४० कैद्यांचा समावेश असून यामध्ये ३३ पुरुष, २ महिला तर पोलीस कोठडीत ५ पुरुष असे आहेत.  या ४० कैदयामधील २८ कैदयांची रॅपीड अॅयन्टीजन टेस्ट करण्यात आली.  यामध्ये ते पॉझीटीव्ह आले आहेत. उर्वरीत १२ कैंदयाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान कैद्यांचे नवीन तहसिल कार्यालय जेलमध्ये विलगीकरण करण्यात आले आहेत.  मंगळवेढा पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी व दोन गार्डवरील सुरक्षारक्षक. एक सबजेल मधील आहार पुरवठादार यांचेही रॅपीड अॅवन्टीजन टेस्ट केल्यानंतर ते पॉझीटीव्ह आले आहेत. सदर पॉझिटीव्ह व्यक्तींच्या निकट संपर्कातील व कमी संपर्कातील व्यक्तींचे वैदयकीय सर्वेक्षणाचे काम आरोग्य विभागा मार्फत युध्द पातळीवर सुरु असल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Advertise