गलाई व्यावसायिकाचा त्याच्याच भागीदाराकडून खून ; खानापूर तालुक्यातील घटना - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 19, 2020

गलाई व्यावसायिकाचा त्याच्याच भागीदाराकडून खून ; खानापूर तालुक्यातील घटना


गलाई व्यावसायिकाचा त्याच्याच भागीदाराकडून खून ; खानापूर तालुक्यातील घटना 
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : गलाई व्यावसायिकाचा त्याच्याच भागीदाराकडून खून झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील मंडळमुठी गावामध्ये घडली. खून झालेल्या गलाई व्यावसायिकाचे नाव महादेव रघुनाथ माळी (वय 29) वर्ष असून आरोपीचे नाव राहुल किसन माळी (वय 24) वर्ष आहे. दोघेहे मादळमुठी गावाचे आहेत. सदरची घटना ही घटना काल रात्री साडे आठच्या सुमारास मादळमुठी येथे मयत महादेव माळी यांच्या घरासमोर घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी राहुल माळी यास काल रात्री अटक असून राजाक्का महादेव माळी यांनी विटा पोलिसात आरोपी विरुद्ध फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उत्तरप्रदेश येथे सृजानगंज या ठिकाणी मयत महादेव व राहुल यांच्यात भागीदारीत गलाई व्यवसायाचे दुकान होते. लॉकडाउनपुर्वी ते मादळमुठी येथे गावी आले आहेत. रात्री महादेव याने राहुलकडे गलाई व्यवसायातील भागीदारीचे पैसे व साहित्य परत मागितले. त्यावरून दोघांचा वाद सुरू झाला. त्यातून रागाने राहुल याने महादेवला त्याच्या पोटात व छातीवर धारदार कोयत्याने वार करून भोसकून पळून गेला. महादेव याला नातेवाईकांनी उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टररांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कोयत्याने वार करून दुचाकी गाडीवरून पळून निघालेल्या राहुल माळी याला लेंगरे येथे पोलिसांनी पकडले. त्यास अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री. शेळके यांनी दिली असून सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप झालटे तपास करत आहेत. 

No comments:

Post a Comment

Advertise