कु. प्राजक्ता बाड बारावीला आटपाडी तालुक्यात प्रथम ; ९४.३० टक्केवारी ; गणितामध्ये १०० पैकी १०० तर भौतिकशास्त्रामध्ये ९८ मार्क - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 16, 2020

कु. प्राजक्ता बाड बारावीला आटपाडी तालुक्यात प्रथम ; ९४.३० टक्केवारी ; गणितामध्ये १०० पैकी १०० तर भौतिकशास्त्रामध्ये ९८ मार्ककु. प्राजक्ता बाड बारावीला आटपाडी तालुक्यात प्रथम
९४.३० टक्केवारी ; गणितामध्ये १०० पैकी १०० तर भौतिकशास्त्रामध्ये ९८ मार्क
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कु. प्राजक्ता प्रदिप बाड विठ्ठलापुर, या विद्यार्थीनीने बुद्धीमता, सातत्य, नियोजन, कष्ट करण्याची तयारी, एकाग्रता या गुणावर बारावी सायन्स ला ९४.३०% गुण मिळवून तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
मुळातच अभ्यासामध्ये हुशार असणाऱ्या कु प्राजक्ता हिने कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता जिद्दीच्या जोरावर यश संपादक केल्याने विद्यार्थ्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गणित विषयात तिने १०० पैकी १०० गुण मिळविले आहे तर  भौतिकशास्ञ विषयात ९८ गुण मिळविले आहे. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकरी कन्येने विठ्ठलापुर सारख्या ग्रामीण भागात राहुन ९४.३०% गुण मिळवणे हे नक्कीच आंनददायी असल्याचे मत दैवत काळेल यांनी व्यक्त केले.
प्राजक्ताला दहावीला ९७% मार्क्स मिळाले होते. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल लोणारवाडी बोंबेवाडी गुरुकुलचे संस्थापक मार्गदर्शक दिनकर करांडे, लोणारी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दैवत काळेल,विठ्ठलापुरचे सरपंच इंदुबाई बाड, प्राजक्ताचे आई, वडील, चुलता, काकी, लहान भाऊ व यांनी तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

1 comment:

  1. https://www.mandeshexpress.com/2020/07/Ms-Prajakta-Bad-HSC-first-in-Atpadi-taluka.html


    💐🖕🌹 Congratulations

    ReplyDelete

Advertise