मेव्हण्याच्या मुलीच्या लग्नाला गेला अन कोरोना पॉझिटिव्ह झाला - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 14, 2020

मेव्हण्याच्या मुलीच्या लग्नाला गेला अन कोरोना पॉझिटिव्ह झाला


मेव्हण्याच्या मुलीच्या लग्नाला गेला अन कोरोना पॉझिटिव्ह झाला
माणदेश एक्सप्रेस न्युज
सदाशिवनगर/प्रतिनिधी : पुरदांवडे, सदाशिवनगर येथील पुरुष मेव्हण्याच्या मुलीच्या लग्नाला गेला, अन कोरोना पॉझिटिव्ह झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, काल दुपारी खाजगी रुग्णालयात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने योग्य वेळी दखल घेऊन नियोजन पदध्दतीने प्रशासनाने तात्काळ तो परिसर सील केला असल्याची माहिती सदाशिवनगर मंडळ अधिकारी संदीप चव्हाण व माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वबंर गोल्डे यांनी दिली.
सदाशिवनगर, पुरदांवडे हा परिसर ग्रामिण भाग असल्याने तात्काळ उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले पोलिस स्टेशन, आरोग्य विभाग यांच्या वतीने या परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन आरोग्य विभागा मार्फत डॉ मेहता यांनी दिलेल्या सुचनेवरुन ग्रामपंचायत पुरदावंडे व सदाशिवनगर यांनी कोरोना बाधीत रुग्णाचा परिसर सील करून निर्जंतुकीकरण केले आहे तसेच त्या बांधीत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध सुरू आहे.
 प्रशासनाने दोन्ही गावातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कस अंगणवाडी सेविका यांना त्या परिसरातील घरोघरी पाठवुन माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. त्याच बरोबर घरातील कोरोना बाधीत संपर्कातील १४ जणांना क्वारंनटाईन करण्यात आले असुन त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच त्या व्यक्तीच्या संर्पकातील इतर लोकांचा शोध सुरू आहे. सदाशिवनगर, पुरदांवडे दोन्ही गावे अत्यावश्क सेवा वगळता १४ दिवस पुर्ण बंद ठेवण्यात आली आहेत. सदाशिवनगर,पुरदावंडे ग्रामपंचायत व माळशिरस पोलिस स्टेशन, महसुल विभाग, आरोग्य विभाग यांच्या वतीने नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, आपल्या घरात बसावे, तोंडाला मास्क लावुन बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise