जप्त केलेल्या मळीचा 20 जुलै रोजी जाहीर लिलाव - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 14, 2020

जप्त केलेल्या मळीचा 20 जुलै रोजी जाहीर लिलाव


जप्त केलेल्या मळीचा 20 जुलै रोजी जाहीर लिलाव
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सांगली यांनी मुंबई दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत नोंदविलेल्या गुन्हा रजि. क्रमांक 84/2019 व 85/2019 दि. 23 मे 2019 मध्ये जप्त केलेल्या एकूण अंदाजे 7.5 मे.टन मळीचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. सदर लिलाव दि. 20 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सांगली यांचे कार्यालय डी-मार्ट शेजारी, 100 फुटी रोड सांगली येथे करण्यात येणार आहे. अशी माहिती निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सांगली यांनी दिली.
लिलावाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सांगली यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाची इतर विधीग्राह्य अनुज्ञप्ती धारण करणाऱ्या अनुज्ञप्ती धारक किंवा अनुज्ञप्ती धारण करणाऱ्या संस्थेस या लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सांगली यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise