मामा भाचे भांडणात दहाजण गंभीर जखमी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 26, 2020

मामा भाचे भांडणात दहाजण गंभीर जखमी


मामा भाचे भांडणात दहाजण गंभीर जखमी 
माणदेश एक्सप्रेस न्युजम्हसवड/प्रतिनिधी : मणकर्ण वाडी ता. माण येथे दोन गटात शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणामध्ये दहा जण जखमी झाले आहेत. मामा आणि भाचे यांचा जमीनीचा वाद गेल्या अनेक वर्षापासून आहे. वादाचे पर्यावसन मारामारी मध्ये असून एकमेकांच्या मारामारी मध्ये दहा जण गंभीर झाले असून  त्यांच्यावर सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.याबाबतची माहिती अशी की मनकर्णवाडी तालुका माण येथील मोहिते व जगदाळे या कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बांधावरून भांडण आहे. या भांडणाचे रुपांतर मारामारी मध्ये झालेला आहे. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना दगड, कुऱ्हाडी आणि काठ्याने मारहाण केल्यामुळे दोन्ही कुटुंबातील दहा जण जखमी झाल्याची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात  करण्यात आलेली आहे. चार आरोपींना म्हसवड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 307 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.परस्परांनी केलेल्या मारामारी मध्ये दोन्ही कुटुंबातील सतरा सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून दोन्ही कुटुंबाच्या वादाचे पर्यावसन गंभीर मारामारी मध्ये झाल्यामुळे गावांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे तर दोन्ही कुटुंबातील सदस्य गंभीररित्या जखमी झालेले आहेत.यामध्ये  बाळू आवबा मोहिते, नारायण आवबा मोहिते, आप्पासाहेब मोहिते, लालासाहेब मोहिते, किरण नारायण मोहिते, आकाश नारायण मोहिते, दत्तात्रय मोहिते, सूनील बाळकु मोहिते, अनिल बाळकु मोहिते, मल्हारी आप्पा मोहिते, ज्योतीराम आप्पा मोहिते,रा.मणकर्ण वाडी यानी आपणास व आपल्या कुठुंबाला मारहाण करुन जखमी केल्याची फिर्याद महादेव जगदाळे यांनी केली आहे. तर महादेव कृष्णा जगदाळे, सुनिल विठ्ठल जगदाळे, विठ्ठल महादेव जगदाळे, दशरथ महादेव जगदाळे, अमोल विठ्ठल जगदाळे, उज्वला विठ्ठल जगदाळे रा. सर्व मणकर्ण वाडी यांनी मारहाण करुन जखमी केल्याची फिर्याद  लालासाहेब आवबा मोहिते यांनी दिली आहे. अधिक तपास स.पो.नि. गणेश वाघमोडे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise