मुंबईच्या पालकमंत्र्यांना कोरोना - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 20, 2020

मुंबईच्या पालकमंत्र्यांना कोरोना


मुंबईच्या पालकमंत्र्यांना कोरोना
मुंबई :  राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात अस्लम शेख यांनी टवीट करत माहिती दिली आहे. ’मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं त्यांनी टवीट करत म्हटलं आहे. मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे, असंही अस्लम शेख यांनी म्हणाले आहेत. 
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी देखील स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाले आहे. मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनीच ही माहिती टिवट करुन दिली आहे. गडाख यांच्या वाहन चालकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. माझ्या पत्नीची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून शनिवार, 18 जुलैला माझा स्वॅब दिलेला आहे. त्यामुळे मी स्वत: होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. आपणही आपल्यासह कुटुंबियांची काळजी घ्या. घरी रहा, सुरक्षित रहा, असं टवीट शंकरराव गडाख पाटील यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment

Advertise