राजू शेट्टींचं दूध आंदोलन म्हणजे फिक्सिंग : सदाभाऊ खोत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 20, 2020

राजू शेट्टींचं दूध आंदोलन म्हणजे फिक्सिंग : सदाभाऊ खोत


राजू शेट्टींचं दूध आंदोलन म्हणजे फिक्सिंग : सदाभाऊ खोत
सांगली : राजू शेट्टी यांचं आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंगप्रमाणे दूध फिक्सिंगचं आंदोलन असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सरकारने त्यांना चर्चेसाठी ज्या दिवशी बोलावलं त्याच दिवशी ते आंदोलन करत आहेत, त्यांची ही भूमिका दुटप्पी आहे. तसंच आमदारकी मागायला तुम्ही बारामतीला गेलेत मात्र बैठकीसाठी न जाता आंदोलन करतात, ही भूमिका शंकास्पद असल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे.
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बोलावलेल्या बैठकीला विधान परिषदेच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. आम्ही फॉरेनहून आलो आहोत काय? असा सवाल करत, जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही परदेशी वाटलो असल्यानेच त्यांनी बैठकीला बोलावलं नाही, आम्ही आमदार आहोत, आम्हालाही बैठकीला बोलावलं पाहिजे होतं, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे. 
दूध दरवाढी संदर्भात भाजपच्या आमदारांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनी निवेदन दिलं आहे. जर दूध दरवाढ केली नाही, तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशाराही, सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Advertise