Type Here to Get Search Results !

विटा येथे 'जागतिक लोकसंख्या दिन' साजरा ; दिप फाऊंडेशन यांचेवतीने आयोजन : प्रा.डॉ.बाळासाहेब कर्पे यांचे विशेष मार्गदर्शन

माणदेश एक्सप्रेस

विटा येथे 'जागतिक लोकसंख्या दिन' साजरा
दिप फाऊंडेशन यांचेवतीने आयोजन : प्रा.डॉ.बाळासाहेब कर्पे यांचे विशेष मार्गदर्शन 
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : विटा येथे जागतिक लोकसंख्या दिना निमित्त दीप फौंडेशन यांच्या वतीने कार्यशाळा संपन्न झाली या. वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकसंख्या विषयक विचार या वर चर्चा करण्यात आली. मार्गदर्शनात प्रा. डॉ. बाळासाहेब कर्पे म्हणाले की, 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या पाच अब्ज झाली.  त्यामुळे लोकसंख्या वाढ हा विषय जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला. 1989 ला संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास विषयक कार्यक्रमाच्या "गव्हर्निंग कौन्सीलिंगने" 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जावा अशी शिफारस केली त्यानुसार 11 जुलै हा लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्याल समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रा. कर्पे पुढे म्हणाले की, वाढती लोकसंख्या या विषयांचे गांभीर्य ओळखून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाचे विचार मांडले होते. स्वतंत्र मंजूर पक्षाची घटना,  ध्येय व कार्यक्रम या बद्दलचा वृत्तांत 15 ऑगस्ट 1936 ला टाईम्स ऑफ इंडिया च्या अंकात प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये त्यांनी "लोकसंख्येचा ताण" या विषयावरती लेख लिहून देशातील बेकरीचे मुळ कारण लोकसंख्या वृद्धी हेच आहे. म्हणून संतती नियमनाचा पुरस्कार करण्याचे आवाहन केले होते. डॉ. आंबेडकरांनी लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्ताव आपले सहकारी पी.जेरोहम यांच्या कडून विधानसभेत 10 नोव्हेंबर 1938 रोजी मांडला होता. आज कित्येक वर्षे झाली पण लोकसंख्या नियंत्रणावर जाणीव पूर्वक प्रयत्न केले जात नाहीत.
जन्माचे प्रमाण झपाट्याने वाढत असून मृत्यचे प्रमाण तितक्याच वेगाने घटत असल्याने बेकारीचे प्रमाण वाढत आहे. शहरात लोकसंख्या वाढीमुळे निकृष्ट आहार, राहण्याच्या जागेचे गंभीर प्रश्न,  लोकसंख्येच्या प्रमाणात उत्पन्न कमी, सारख्या अडचणी आपल्या समोर उभ्या आहेत.  म्हणजे दारिद्र्य निर्मूलनासाठी पर्यावरणाचा समतोल, राखण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात राहणे आवश्यक्य आहे याची जाणीव डॉ. बाबासाहेबानी करून दिली होती. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रभावी अंलबजावणी करणे गरजेचे बनले आहे. लोकसंख्या वाढीमुळे शहरातील अनेक कुटूंबात आरोग्याच्या,  व्यसनाच्या समस्या निर्माण होत आहेत. महिला सक्षमीकरणासंदर्भात डॉ. आबेडकरांनी कुटुंब नियोजनाचा प्रकर्षणांने विचार केलेला दिसून येतो. यात त्यांनी छोट्या कुटुंबाची संकल्पना मांडली. यामागे स्त्रियांचा विकास करणे हा हेतू होता. कुटुंब, मुलांचा विकास, स्त्रियांचे आरोग्य, देशाची प्रगती, दारिद्र्य निवारण, अन्नपुरवठा अशा विविध दृष्टीकोनातून  डॉ.बाबासाहेबानी विचार मांडले होते.  म्हणून आपण सर्वांनी हा विषय हाती घेऊन प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी त्यामध्ये अग्रक्रमाने या चळवळीत सहभाग दर्शिवला तर निश्चित पणे लोकसंख्या नित्रणात राहू शकते अन्यथा भावी पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील.
यावेळी असलम शेख, रोहीत पवार, कोमल हसबे, प्रमोद भोसले, केदार जावीर, राखी माने, दिव्याणी हराळे यांच्यासह अन्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितिन चंदनशिवे यांनी केले तर आभार कोमल हसबे यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies