सांगोला तालुका समन्यायी आखणीचा आराखडा अंतिम टप्यात ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ भारत पाटणकरांच्या उपस्थितीत स्मार्ट बैठक संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 11, 2020

सांगोला तालुका समन्यायी आखणीचा आराखडा अंतिम टप्यात ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ भारत पाटणकरांच्या उपस्थितीत स्मार्ट बैठक संपन्न


सांगोला तालुका समन्यायी आखणीचा आराखडा अंतिम टप्यात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ भारत पाटणकरांच्या उपस्थितीत स्मार्ट बैठक संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला : सांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाची बैठक डॉ.भारत पाटणकरांच्या उपस्थितीत, अधिक्षक अभियंता हणमंत गुणाले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा वापर करत हि बैठक ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये कार्यकारी अभियंता सचिन पवार, कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, कार्यकारी अभियंता हरगुडे, कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील, सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रगती यादव तसेच श्रमिक मुक्ती दल पाणी संघर्ष चळवळीचे आनंदराव पाटील व गणेश बाबर आपापल्या ठिकाणाहून सामील झाले होते. यावेळी सांगोला, आटपाडी व तासगाव समन्यायी पाणी वाटपाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अत्यंत नेमकेपणाने झालेल्या चर्चेदरम्यान सांगोला समन्यायीच्या प्रगतीची माहिती कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी दिली. तालुक्यातील सर्व गावांची आवश्यक असणारी बहुतांश माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी उपलब्दतेच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील एकूण १०४ गावांपैकी ६७ गावे हि तुटीची असून ३७ गावे सरप्लस आहेत. समन्यायी पाणी वाटपाच्या मार्गदर्शक तत्वानुसार तालुक्याच्या एकूण ३ लाख २५ हजार एकर लागवडीयोग्य क्षेत्राला आवश्यक असणारे पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले. सध्या तयार करण्यात येत असलेल्या आराखड्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा एकात्मिक विचार करण्यात आला आहे. भौगोलिक स्थितीनुसार काही ठिकाणी उचलपणी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बुध्दीहाळ मध्यम प्रकल्पामध्ये थेट टेंभू योजनेतून पाणी देण्याचे नियोजन यामध्ये आहे. सध्या हा आराखडा अंतिम टप्प्यात असून आणखी काही बारकाव्यांचा समावेश करून लवकरच तो अधीक्षक अभियंता यांच्या निरीक्षणासाठी ठेवण्यात यावेळी झालेल्या चर्चेमध्ये डॉ भारत पाटणकर यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या त्यानुसार आवश्यक ती कारवाही करण्याचे ठरले. अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी जुलै महिना अखेरीस चालू होणाऱ्या टेंभूच्या आवर्तनादरम्यान आटपाडी तालुक्यातील बंद पाइपच्या नव्याने पूर्ण होणाऱ्या कामाची चाचणी घेण्याचे आदेश दिले.

No comments:

Post a Comment

Advertise