उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आश्वासनानंतर वीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन स्थगित - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 9, 2020

उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आश्वासनानंतर वीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन स्थगितउर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आश्वासनानंतर वीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन स्थगित 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/विनायक ऐवळे : वीज कंत्राटी कामगारांचे बेमुदत सुरु असलेले आंदोलन दिनांक ८ रोजी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आश्वासन दिल्यामुळे स्थगित करण्यात आले.
याबाबत अधिका माहिती अशी की, संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने त्यांच्या विविध मागण्या संदर्भात बेमुदत आंदोलन सुरु केले होते. यामध्ये सदरचे आंदोलन हे चार टप्प्यांमध्ये करण्यात येणार होते. यामध्ये १५ जुन पर्यंत पहिला टप्पा होता. 
या दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव या पदाचा प्रभारी पदभार असलेले व महापारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन या आंदोलनाची ची पार्श्वभूमी तसेच महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीत कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या आर्थिक अन्यायाबाबत पिळवणूक की बाबत पूर्णतः कल्पना देऊन हे आंदोलन प्रशासनानेच आम्हाला कशाप्रकारे करण्यास प्रवृत्त केले याबाबत त्यांना अवगत केले त्यांनीदेखील यामध्ये नक्कीच सकारात्मक विचार करून याबाबत ऊर्जामंत्री महोदय यांच्याशी विशेष चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्याबाबत चर्चा करून त्यांनी प्रलंबित मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीमंत काळेल व सांगली जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Advertise