अभिनेता रितेश व जेनेलियाने केला अवयवदानाचा संकल्प - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 2, 2020

अभिनेता रितेश व जेनेलियाने केला अवयवदानाचा संकल्प


अभिनेता रितेश व जेनेलियाने केला अवयवदानाचा संकल्प
मुंबई : डॉक्टर दिनाचे औचित्य साधत अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा देशमुखने अवयवदानाचा संकल्प केला आहे. दोघांनी याबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत दिली.
फार आधीपासून अवयवदानाचा विचार रितेश आणि मी करत होतो. आम्ही आमचे अवयव दान करण्याचा डॉक्टर दिनाचे औचित्य साधत निर्णय घेत आहोत. आम्ही हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल डॉ. नोझर शेरिअर चे आभार मानतो. एखाद्याला सर्वोत्तम भेट द्यायची असेल तर जीवनदान हीच भेट सर्वोत्तम असू शकते. तुम्ही देखील या उपक्रमात सहभागी व्हा आणि अवयवदान करा, असे आवाहन दोघांनी केले आहे. एखाद्याला अवयवदानामुळे नवीन आयुष्य मिळू शकते, त्यांचे थांबलेले जगणे सुरू होऊ शकते. त्यामुळे अवयवदानाचे महत्त्व पटवून देताना अनेक कलाकार दिसतात. 

No comments:

Post a Comment

Advertise