विठ्ठल चमत्कार करणार असेल, तर मुख्यमंत्री काय करणार? आ. नितेश राणे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 2, 2020

विठ्ठल चमत्कार करणार असेल, तर मुख्यमंत्री काय करणार? आ. नितेश राणे


विठ्ठल चमत्कार करणार असेल, तर मुख्यमंत्री काय करणार? आ. नितेश राणे 
मुंबई : कोरोनाच्या सावटाखाली पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्यावतीने विठ्ठलाची शासकीय महापूजा केली, तसेच राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाला साकडे घातले. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी विठ्ठलाला चमत्कारासाठी साकडे घालणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.
नितेश राणे यांनी टिवट करीत ‘मुख्यमंत्री होण्यासाठी पवार साहेबांनी चमत्कार केला. आमदार होण्यासाठी मोदी साहेबांनी चमत्कार केला. आता कोरोना जाण्यासाठी विठ्ठलाने चमत्कार करावा, मग हे काय करणार?’ असा सवाल करीत त्यांच्यावर निशाना साधला आहे.No comments:

Post a Comment

Advertise